![]() |
MonyRupis |
झाकली मूठ लाखाची
एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्याला कळले.
त्याने सहा हजार रुपयाचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले रंगवले...
आणि राजा आला पूजेला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले पुजार्याला तिथेच घाम फुटला. सहा हजार कर्ज काढून रंगवले आणि राजाने फक्त चार आणे ठेवले...
पुजारी हुशार होता.
राजा गेला कि ह्याने ते चार आणे हातात घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला...
राजाने एक वस्तू ठेवली आहे ते मला झेपणार नाही म्हणून मी लिलाव करतोय करा वार...
आता राजाने ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का.
पहिलाच वार दहा हजार पासून.
पुजारी नाही परवडत.
पन्नास हजार.
पुजारी नाही.
राज्याला पहारेकर्यामार्फत कळते काय चाललंय ते कि पुजाऱ्याने तुम्ही ठेवलेल्या वस्तूचा लिलाव करतोय म्हणून म्हणून.
दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय,
राजा तसा पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला हे माझे माय सव्वालाख देतो पण कुणाला दाखवू नको.
No comments:
Post a Comment